क्षितिजावर शुक्र चांदणी तू ,
मम मनातली फुलराणी तू
दवबिन्दुंची आरास पुन्हा
मोत्यांचा केवळ भास पुन्हा
ओघळुन जाती क्षणात जे
ते अळवावरचे पाणी तू
पकडतो कवडसे उन्हात मी
झेलतो चांदणे मनात मी
गुंजतात केवळ कुंजबनी
ती मंजुळ कोकिळ गाणी तू
मयसभेत वावरतो आहे
कधी दिसशी तू, परी नसशी तू
जाउन परी जाशील कुठे
हृदयावर नक्श गोंदणी तू
Monday, February 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
You have a very strong grip on language..Keep up..Words can lift the earth even without Archimedes' lever..
You may see my English blog too
ngadre.wordpress.com
Post a Comment