Monday, February 23, 2009

मन फितूर फितूर

चांदणं टिपुर
मन फितूर फितूर
पाण्यामधे चन्द्र
आणि मन आतुर

टळटळीत दुपार
मन रुखं रुखं
गुलाबी पहाट
मन धुक धुक

सोसाट्याच्या सरी
मन आडोसा आडोसा
श्रावणाची उन्ह
आणि मन कवडसा

सुर्यबिम्ब बुड्ताना
मन आरक्त आरक्त
आणि रान फुलताना
मन प्राजक्त प्राजक्त

वाळवंटी घामाघुम
मन आसुस आसुस
दारी सुकलेलं रोप
मन पाउस पाउस

मंदिरात घंटानाद
मन अभंग भूपाळी
गाभार्यात नंदादीप
मन आरास दिवाळी

1 comment:

a Sane man said...

सुर्यबिम्ब बुड्ताना
मन आरक्त आरक्त
आणि रान फुलताना
मन प्राजक्त प्राजक्त

zakaas!