घननीळा कृष्ण दाटतो, धरा ही राधा होउनी जाते
कुंजात वाजते शीळ, हवा मल्हार होउनी जाते
थिरकती थेम्ब पाण्यात
अंगणी पावले इवली
रानात नाचतो मोर , मन मोरपिसारा होते
झंकार विजेचा गगनी
उधळते कस्तूरी माती
रत्नांची उधळण रानी , मन हिरवा पाचू होते
ती चिम्ब तरी अतृप्त,
तो बरसून उरतो पुन्हा,
अंतराळ व्यापून उरते हे पवित्र सुंदर नाते
Thursday, February 26, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
काळात नकळत तू किती रंग भरले आहेस पहा..
सुन्दर निळाई आणि हिरवाई दिसते कवितेत..
छान..
Post a Comment