Thursday, February 26, 2009

हे फ़क्त तुझ्यासाठी, माझ्या बाळा.

पहाटेचा एक किरण धुक्याच्या दुलईतुं झिरपत जेव्हा माझ्या दारात आला तेव्हा मला तू आठवलिस...
गुलाबाच्या पाकळ्यान्मधुन दवाचा एक थेम्ब जेव्हा लूक्कन हसला तेव्हा मला तू आठवलिस...
उडत उड़त एक मऊ मऊ म्हातारी अलगद जेव्हा माझ्या ओन्जळित येवून बसली तेव्हा मला तू आठवलिस...
साखरझोपेत असताना कोणीतरी जेव्हा माझ्या गालावरून मोरपिस फिरवल तेव्हा मला तू आठवलिस...
चिउताई जेव्हा घरट्यातल्या चिवचिवणार्या पिल्लाला दाणा भरवत होती तेव्हा मला तू आठवलिस...

ढगांच्या गोधडित लपेटून, हरणांच्या गाडीतून चांदोमामा तुला घेवून आला होता।
लिम्बोणीच्या झाडामागून तो चांदोमामा आता रोज बघतो त्याच प्रतिबिम्ब!
माझ्या कुशीत...

10 comments:

Anonymous said...

गप्प बस.. कशाला रडवतेस..!!
मला ही छोटं बाळ आहे..

खूप खूप गोड ओळी..बाळासारख्याच गोड. .

Anonymous said...

खरं सांगु कां? अशा घासुन गुळगुळीत झालेल्या वपु काळेंच्या सारख्या ओळी लिहिण्यापेक्षा अगदी रोजच्या भाषेत मनात येइल ते लिहिलं तर वाचायला जास्त अपिल होतं. ( निदान मला तरी.. अशी छापिल मराठी वाचायला फारशी आवडत नाही) अगदी मनापासुन खरोखर प्रतिक्रिया दिलीआहे . राग नसावा.

Anonymous said...

मलाही आधी असंच वाटायचं.. मला स्वत:ला असं लिहिता येत नाही.. (म्हणजे काव्यमय..)

मी ही फ़क्त factual वाचायचो..अनिल अवचट..अरुण साधू.. "रिपोर्ताज" टाईपचं लिखाण..

अजूनही मी अशा लिखाणाचा fan आहे.. तुम्ही ही माझ्या "वाचनीय" मित्रांच्या यादीत आहात..

पण कधीतरी माझ्या असं लक्षात आलं की शब्दांशी खेळणं यातही मजा आहे..

पुस्तकी म्हणजे तरी काय..? आपण रोज बोलताना वापरत नाही ते शब्द ना ??

म्हणूनच ते ठेवणीतल्या कपड्यांसारखे बाहेर काढून वापरायला कधी कधी काय हरकत आहे ??

दाढी ठरवलं तर चाकूने ही करता येईल.. पण आपण वेगवेगळ्या वासांचा शेविंग फोम.. जिलेट MAC III आणि कायकाय गुळगुळीत वापरतोच की.. अलंकारच ते..

........

लिंबोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला गं बाई..

आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही..

.........

हेच सरळ शब्दात सांगता आलं असतं.. की माझ्या मुलाला झोप न येण्याचं कारण काय??

पण वरच्या ओळी किती हात घालतात मनाला .. म्हटल्या तर कृत्रिमपणे जुळवलेल्याच आहेत..

Mahendra Kulkarni said...

ते खरंय.. मी जेंव्हा अगदी विशी पंचविशीत असेल तेंव्हा वपु माझे फेवरेट होते. पार्टनर मला पाठ आहे.. बिलिव्ह मी.. पण आता पाय जमिनिवर परत टेकलेत. त्यामुळे जरा आवड बदलली. मला कणेकर मनापासुन आवडतात. आणि बरेच लेखक.. नविन मधे मंगला गोडबोले.. माझ्या आवडत्या आहेत लेखिका म्हणुन. त्यांचा लेख दर रविवारी वाचतॊ लोकसत्ता मधे..
अर्थात, अशा सुंदर शब्दांची महिरप करुन लिहिलेलं लिखाण म्हणजे पण एक आर्ट आहे. पण मला वाटतं मला थोडं जास्त रिअलॅस्टीकच आवडतं.. सोनलचा तो लेख छान आहे ... मुलांच्या प्रश्नावरचा..

Anonymous said...

http://suparnachyakavita.blogspot.com
माझ्या सौ. च्या कवितांचा ब्लॉग. पुर्वी ती कविता करायची तेंव्हा केलेला आहे हा. पण हल्ली कामाच्या गडबडित तिला वेळ मिळत नाही.
आता कळलं कां काव्यात्मक वाचायचा कंटाळा का येतो मला? :) आणि बाय द वे माझ्या घरी मी लिहितो हे माहिती नाही कोणालाच.. आहे की नाही गंमत? मुद्दामच सिक्रेट हॉबी ठेवली आहे ही.
यातल्या काही कवितांना बक्षीस पण मिळालं होतं.. साधारण ३-४ कवितांना..

Anonymous said...

महेन्द्रजी .. आधी हात मिळवा.. शिरीष कणेकरांचा मी डाय हार्ड fan आहे..

इतकं मनापासून आणि कोणतीही फालतू बंधनं न मानता लिहिणारं दुसरं कोणी नाही ..

दुसरा मुद्दा म्हणजे माझं blogging सुद्धा माझ्या घरच्यांना माहीत नव्हतं.. नुकतंच माहीत झालं..

आणि नेमकं माझं लेटेस्ट पोस्ट दारूशी रिलेटेड .. त्यामुळे आईला फारसं आवडलं नाही..

तिला कसं समजावणार की ते बरंचसं fictious आहे ..(खरं तर थोडंसंच fictious आहे..)

बायको आहे पंजाबी .. त्यामुळे तिथे फारसा प्रश्नच नाही..

मीच लिहितो आणि मीच वाचतो..

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

होत अस कधी कधी. I can understand.
बरच काही त्या त्या वेळ्च्या मूड्वर अवलंबून असत.
मला सुद्धा कधी कधी वपुर्झा आवडत आणि कधी कधी अविनाश धर्माधिकारी, इरावती कर्वे वगैरे मंडली आवडतात.
जेवणात एकाच एक चव असेल तर काय होइल? भाषेच पण तसच आहे.
आपल्या साहित्तिकन्नी आपल्याला सगले रस चाख्वाले म्हणुन तर आपण आपल्या भाषेचे अभिमानी झालो. त्यातला खजिना त्यांनी उघड करून दाखवला म्हणुन गोडी लागली.
राग अजिबात आला नाही. तुम्ही सुद्धा जेव्हढ्या तल्मालिने रोख थोक लिहिता तेव्ह्ढ्यच भक्तिने पाडगावकर सुद्धा जपताच न?
म्हणुनच माझे २ ब्लॉग वेग्ळे केले. माझे ओल्डर पोस्ट्स वाचलेत तर मी पण थोडीशी तुमच्यासार्खीच होते अपसेट झाल्यावर हे कळेल तुम्हाला. :) Thanks फॉर प्रान्जळ reply.

Yogesh said...
This comment has been removed by the author.
Yogesh said...

आईने आपल्या बाळा साठी लिहीलेल्या चार ओळी ज्याची तुलना कशाशी करता येणार नाही अगदी कोणत्याही महाकव्याशी देखिल .. ह्या चार ओळी कुठल्याही साहित्य प्रकारात मोडणार नाहीत ..... त्या फ़क्त नीर्मळ भावना आहेत ...... माला जे वाटल ते संगीतल ......

Anonymous said...

हे बाकी तुमचं खरं.. मंगेश पाडगांवकर म्हणजे .........शब्दात सांगता येत नाही. तसेच इंदिराबाई पण मला आवडतात. असो..
असो...
माझी सवय आहे, जे काही मनात येइल ते लिहायचं. एक शब्द लिहितांना मी दुसरा शब्द कुठला असेल ह्याचा विचार करित नाही. जे मनात असेल ते सरळ टाइप होतं. आणि एकदा लिहिलं की झालं, त्यामधे एडीटिंग नाही. जे मनात - तेच कागदावर.. अगदी ’दिल से’ !