बंडी: (आपला जाड़ भिंगाचा चश्मा डोळ्यावर चढवत) हम्म, विचार.
बंड्या: बालपण म्हणजे काय ग ?
बंडी: 'काय' म्हणजे 'काय'?
बंड्या: बालपण बालपण.
बंडी: कुठे एइकलास हे?
बंड्या: अग आज TV वर कसला तरी program होता. एक खूप हुशार माणूस दुसरया खूप हुशार माणसाला सांगत होता की लहान मुलांच ‘बालपण हिरावून घेत आहेत…’ अस काहीतरी.
बंडी: मी पण पहिल्यांदाच एइक्तेय हा word. Dictionary मधे बघाव लागेल.
बंड्या: अग पाहीला मी. पण माझ्या oxford dictionary मधे सापडला नाही. म्हणुन तर तुला विचारायला आलो.
बंडी: मग इन्टरनेट वर बघुया न.
बंड्या: ते सुद्धा केलं . ‘Term not found’ येतय सारखं.
बंडी: मग बाबांना विचार.
बंड्या: विचारलं. तर म्हणाले लहान मुलासारखे प्रश्न विचारू नकोस.
बंडी: मग आईला विचार.
बंड्या: तिची पण ऑफिसची घाई होती. सकाळी सकाळी माझं डोक खाऊ नकोस म्हणाली. त्यापेक्षा UCMAS चा अभ्यास कर म्हणाली.
बंडी: मग?
बंड्या: मग काय. UCMAS चा अभ्यास केला. तो पर्यंत drawing क्लास ची वेळ झाली.
बंडी: मग drawing teacher ला विचारायच ना…
बंड्या: तिला वेळच नव्हता. आमची drawing books तपासण्यात busy होती ना. माझ्या जागेवर यायला तिला fifteen minutes लागली आणि माझ्या मागे पण अजुन टेन मूलं होती. त्यात आमच्या सगळ्यांच drawing wrong झाल होत.
बंडी: सगळ्यांच एकाच वेळी? कसलं एवढ difficult drawing दिल होत तुम्हाला?
बंड्या: My village.
बंडी: मग तू काय काढलस?
बंड्या: अग मी त्या resort मधल draw केलं. Cottage आणि swimming pool. आणि थोड़े hills.
बंडी: (जोरात हसते…) stupid आहेस. आम्हाला आमच्या teacher ने सांगितल होत की village मधे river असते, swimming pool नाही काही. आणि huts असतात.
बंड्या: मला काय माहीत! मला आई बाबा vacation मधे जिकडे नेतात तिकडचं drawing केलं मी.
बंडी: मग school मधल्या teacher ला विचारलास का?
बंड्या: छे छे. तिला कस कळनार. ती फ़क्त English मधे बोलते. आणि नेहमी busy असते. या week मधे तर आम्हाला थ्री assignments complete करायला दिल्या होत्या. त्या सगळ्या check करायच्या होत्या तिला. Next week मधे पण two assignments आहेत.
बंडी: मला सुद्धा आहेत. ‘Best out of waste’, आणि ‘science project’ करायचय. पण मला no tension. ते सगळ माझं mummy च करते.
बंड्या: (डोळे मोट्ठे करून..) होsss? मग तुमच्या teacher ला कळत नाही?
बंडी: अरे कधी कधी मला त्या assignment मधले words च कळत नाहीत. आणि मी केलं ना की आई म्हणते ‘तू वाट लावशील..छान नाही होणार आणि बक्षिस नाही मिळणार. मी मदत करते’ म्हणुन. नाहीतर नेहमी त्या सीमुटली ला prize मिळत ना. या वेळी आई ने ठरवलच आहे की मलाच prize मिळालं पाहिजे म्हणुन. तुझी mummy नाही तुला मदत करत?
बंड्या: नाही. ती खूप late येते ना. मग माझी hobby teacher मला help करते. बाबा पण busy असतात. कधी कधी तर Sunday ला पण office मधे meeting असते. आणि mummy चा singing class असतो Sunday च्या दिवशी.
बंडी: अय्या मग तू homework कस करतोस?
बंड्या: tution teacher कड़े.. आणि मग घरी आलो की mummy फ़क्त बघते मी complete केले की नाही ते.
बंडी: माझं homework mummy च घेते.
बंड्या: तुझी mummy घरी असते ना. म्हणुन.
बंडी: म्हणुन नाही काही..ती खूप हुश्शार आहे. ती मला पण हुश्शार बनवणार आहे.
बंड्या: कस ग कस? मला पण सांग ना.
बंडी: सोप्प आहे. तिने सांगितलय मला, की मी तुला जे काही read करायला देइन ते सगळ by- heart करायच आणि write करायच. बस. मग मल 100/100 marks मिळतील. मग मी हुश्शार होंइन.
बंड्या: मला पण tution teacher असच सांगते. पण मला ना by-heart करताच येत नाही ग.
बंडी: का रे?
बंड्या: by-heart करायला बसलो ना की सारखे cartoon network वरचे cartoons आठवतात.
बंडी: हेहेहेहे. माझी आई मला TV बघुच देत नाही. मग मी computer games खेळते किंवा activity books मधले exercises करते. Mummy म्हणते activity books मुळे मी अजुन हुशार होइन. तिने तर गंगू ला पण एक आणून दिलय book.
बंड्या: गंगू कोण?
बंडी: आमच्या घरी कमला येते ना तिची daughter.
बंड्या: ती पण शाळेत जाते?
बंडी: हो. पण मराठी. पण ती आपल्यासारखी हुश्शार नाहीये. तिला फ़क्त 60 marks मिळाले. ती by-heart नाही ना करत. म्हणुन. दिवसभर नुसती खेळत असते.
बंड्या: so lucky ना? तिला केवढ खेळायला मिळत. मला फ़क्त Sunday ला sports club मधे खेळायला मिळत. तिकडे पण सर खूप strict आहेत. सारखं training देतात.
बंडी: कधी कधी आमच्या घरी पण येते. एकदम dirty असतो तिचा uniform. मातीत खेळते खूप. सारखं लागत तिला. त्या दिवशी ती mango tree वरून पडली.
बंड्या: होsss? तिला mango tree वर चढ़ता येत?
बंडी: हो. तिला river मधे swim पण करता येत. आणि hills वर पण चढ़ता येत. तिच्या village मधे आहे ना river.
बंड्या: आणि मग ती अभ्यास कधी करते?
बंडी: गंगू म्हणते, की ती शाळेतून घरी आली की homework करते आणि मग दिवसभर खेळते. आणि exam जवळ आली की कधी कधी study करते.
बंड्या: ती tution ला नाही जात?
बंडी: नाही. म्हणुनच म्हटल ना की ती हुशार नाहीये आपल्यासारखी. तिला तिच्या health ची पण care नाही घेता येत. शाळेतून येताना रोज पेप्सी कोला खाते. नाहीतर बर्फाचा गोळा. तोंड सगळ लाल होत तिचं. मला mummy ने सांगुन ठेवलय, की ते कध्धी खायच नाही. त्याच्यात germs असतात ना. म्हणुन ती मला potato chips घेउन देते शाळेत खायला.
बंड्या: मला कुरकुरे…
बंडी: yummy असतात ना ते पण? गंगू ला किती सांगितल मी पण ती ऐकतच नाही. कच्चे mangoes पाडून न धुता तसेच खाते ती…
बंडी ची आजी भिन्तीवरच्या फ्रेम मधून सगळ एइकत असते…कोणालाही न दिसणार पाणी तिच्या डोळ्यात असत आणि ती परोपरीने आपल्या नातीला सांगू पाहत असते…”बालपण म्हणजे हेच असत ग माझ्या बाळे …”
14 comments:
Cool thoughts!!
Just liked it..
Regards
Deepak Mohite
Ex-TISian
Very nice thoughts, very eloquently put across. ह्या संगणकाच्या युगात बालपण आणी पोरखेळ कुठे तरी हरवून गेले आहेत, हेच खरे. तरीपण असामान्य यश मिळवण्याकरीता असामान्य प्रयत्न करावे लागतात, हे देखिल खरे. When the times change we have to change too.
काळ बदलयावर आपल्याही बदलणे गरजेचे आहे, फक्त सकारात्म्क दॄष्टीने ... ह्यालाच प्रगती म्हणतात.
तुझ्या अभिप्रायाबद्दल आभार. काही निवडक माणसांना माझ लिखाण दाखवल्या शिवाय माला चैन पडत नही. तय पैकी तू एक आहेस. तुझी प्रगति ची व्याख्या एकदम बरोबर आहे. आज मात्र आजुबाजुला बघितल की तो सकारात्मक द्रूष्टीकोन हरवत जातांना दिसतो. rat race खुप अस्वथा करते. त्यातूनही अगदी लहान लहान मुलांना सुद्धा त्यात लोट्लेल पहिल की अजुन वाईट वाटत. हा दोष जेव्ह्धा पालकांच्या महत्वाकंशेचा आहे तेव्ह्धाच आपल्या शिक्षण पद्धतीचा देखिल.
ए..मस्त आहे लिहिलेलं..
माझ्या "मी म्हातारा?" मधल्या काही ओळी लिहिताना असंच काहीसं काहीसं मनात होतं..पण क्रिटिक बनायला नको वाटतं.. जग आपापल्या वेगाने वळणं घेत जात रहातं.. माझं लहानपण जसं गेलं, तसंच माझ्या बाळाचं जावं असं वाटणं अगदी साहजिक आहे..पण तसं होण्यासाठी त्याला काळाच्या प्रवाहातून उलटं रेटत रहायला नको वाटतं..
त्यांचं बालपण जिथे आहेत तिथे मजेत जावं असंच वाटतं..त्यांना ती काय "miss" करताहेत ते जाणवून देण्यापेक्षा, जेव्ह्ढं आहे ती ही कसं छान आहे ते जाणवून द्यावं असं वाटतं..
माझ्या ओळी खाली "quote" करतोय..
"मग आम्ही चक्क खेळायचो वगैरे.. क्रिकेट, विटी दांडू..ओढ्यातले (त्या वेळच्या “पर्ह्या” मधले) बारके मासे पकडून पिशवीत भरणं..सायकल हाणत गावभर बोंबलणं..बदा बदा पडणं..आंबे बोरांच्या झाडांना आणि स्वत: ला खोका पाडून घेणं.. हेच आमचे जगण्याचे (आणि मरण्याचे) उद्योग होते.. एखाद्या दिवशी रानात साप (कोकणात “जनावर” म्हणायचे..) निघाला तर मग सगळा दिवस सत्कारणी लागायचा. .."
Thanks. tuz mhanan Khar aahe agdi. ya walnala malahi face karaych aahe aata lavkarach. majhya mulich balpan ya saglya badallelya paristhitinusar japayach prayatna karanhech majhya hatat aahe.
Pan ya lekhat ajun kahi mudde aahet je sudharan/badalan aaplya hatat nakkich aahe. saglyat mahtwacha mhanje palkanni ya rat race madhe whahvat n jan. mulanni kasht karnyawar aakshep nahi. pan spardhechya ya yugat, spardha heathy asel tarach mulanchi yogya development hoil.
ajun ekgosht mhanje aajchya shikshan paddhtit, marks hi itki mothi gosht zaleli aahe ki vishay samjala nahi trai chalel pan mark milayla havet as jhalay. Mulat vikas ha bajulach rahto. palkanni aadhi laksh dil pahije ki mulala vishay ssamjtoy ki aapal ugich ghoktoy? hya goshti tari nidan whyayla hawyat as watat.
अगं सोनल.. तू म्हणतेस ते अगदी खरं सांगायचं तर "अगदी खरं" आहे...!!
मी कन्फेस करतो की आपण (म्हणजे मी) म्हातारं माणूस ठरू नये या भीतीने मी नव्या पिढीच्या कलाकलाने घेतो..
आणि तसाही माझ्या सव्वा वर्षाच्या मुलाच्या मी पूर्ण धाकात आहे..तो म्हणतो " पापा कांट डान्स साला.."
पण इतके भयानक निष्पाप डोळे करून म्हणतो की मी भीतीने "वा वा.. गुड ब्बॉय.." असं म्हणतो..
Tujha sawwa warshacha mulga evadh boltooo???
majhi mulgi agamya bhashet kahitari sangte aani kall nahi mala ki ordate wartun. Ti pan sawwa warshachi aahe.
हो.. तो जे ऐकतो ते सर्व बोलतो..
बाकी "जग्गातालं सग्गळं सग्गळं" बोलत नसला तरी बापाची लाज काढण्यासाठी आवश्यक ते सर्व बोलतो..त्याच्या आईवर गेलाय..
आणि तरीही तो बोललेलं मला समजलं नाही तर तो मला ओरबाडतो.. आत्ताही मी "Scarface" बनून ऑफिसात आलोय. दाढी करताना कापलं म्हणून सांगतो.. नाहीतर काय बोलणार..
wordpresswar navin blog suru kelay.
visit sonalwaikul.wordpress.com
Thanks
वाह! क्या बात है. मस्त झालंय. मला वाटतं लहानपणातलं "खरं लहानपण" आता शोधावंच लागणार आहे.
छान लिहिलय...
प्रगतीच्या नावाखाली नविन पिढी काय काय हरवून बसणार आहे काय माहीत?
फक्त गंगू backward ठरायाची भीती वाटते..
Jyanchya dolyat nustya aathvanini paani yeta tyana lok veda mhantat ka ga? Pan hya dolyatlaya paanya baddal tula shikshe evji bakshish dyayla havay. Chan jamlay, Sadyasthiticha yogya varnan.khup nahi pan barach kahi haravlay he jaanavta aata.
ek saangu ka? baalpan tikavanyavar asate.
Post a Comment