Thursday, February 12, 2009

तो...

चार भिन्तितल्या काळोख्या कोपऱ्यात पथारी पसरून 'तो' बसतो
खिड़की मधून आभाळाचा एक टुकडा तेवढा त्याला दिसतो

सकाळची कोवळी किरण जेव्हा झिरापतात त्या तुकड्यामधुन
ओंडक्या सारख मुर्दाड मन डोकावत त्याच्या डोळ्यातून

चांदणं ही दिसत कधी कधी अवचित
तो मात्र पडून असतो तसाच निपचित

पावसाची झड़ आली की जुन घोंगड़ ओढून घेतो
अंग अजुनच चोरून घेत दिवसभर खोकत राहतो

कधी दिसते रुपेरी कडा काळ्या ढगाला मिळताना
तीही किती भकास दिसते कोरडी भाकरी गिळताना

किती रुतु किती वर्षे अशीच आली अशीच गेली
मनावरच्या वेदनांची काजळीं अजुन काळी झाली

उशालगत ठेवलियेत त्याने काही बोळकी खेळण्यांची
एक विटी काही कवड्या खुण त्याच्या जगण्याची...

2 comments:

Anonymous said...

छान ब्लॉग आहे.. तुझ किंवा माझ अशासारख्या शब्दांसाठी Google Transliteration page वर टाईप करताना tujhn, majhn असं लिहू शकतो. त्यामुळे शब्दाचं मूळचं रुपडं (अंगडं, टोपडं) गोड दिसतं.. शब्द हा नव्या जन्मलेल्या बाळासारखाच ना ??

http://www.google.co.in/transliterate/indic
असंच लिहीत रहा.. माझा ब्लॉग जमलं तर पहा..
नचिकेत
gnachiket.wordpress.com

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

Thanks. Marathi typing kartana ajunahi jara chuka hotat. Yapudhe lakshat thevin.
Tujha blog wachla. Lihinyachi shaili aawadali. Vinodi angane jat marmik bolnyachi paddhat khup chaan.
aaj blogvar ek juni kavita/lalit takat aahe.
adhe madhe wachun abhipray kalvat raha.