Friday, January 9, 2009

सत्यमेव हरते!

एक टिपिकल हिन्दी सिनेमा।
गरीब हीरो आणि श्रीमंतीत लोळणारी हिरोइन। तिला इम्प्रेस करण्यासाठी तो उसने अवसान आणतो। भाड्याचे कपड़े आणतो, भाड्याच्या गाडीमधून तिला फिरवतो। ती फसते। मग तिचा गोड गैरसमज टीकवण्याची त्याची धडपड सुरु होते। भाड्याचे घर, भाड्याचे ऑफिस, भाड्याचे नोकर, भाड्याचे आई-बाप देखिल तो उभे करतो। त्यात त्याला साथ देणारा एखादा जीवभावाचा मित्र असतोच।
आणि एक दिवस त्याच पीतळ उघडं पडतं। ती खुप रडते, त्याचा द्वेष करते, अखेर त्याला सोडून जायला निघते।
तो तिला थाम्बवायला निघतो। डोळ्यात पाणी आणून, सगळ्यात महत्वाच्या कशाचा तरी त्याग करून तिचा विश्वास परत मिलावान्याचा प्रयत्न वगैरे वगैरे...
"कट टू एयर-पोर्ट"
तो तिच्या डोळ्यात डोळे घालून तीची अखेरची समजूत घालतो: " लेकिन मेरा प्यार झूठा नही था। ये सबकुछ मैंने सिर्फ़ तुम्हे पाने के लिए किया..."
झाल! ती वितळते। मोहिम फत्ते। शेवट गोड। प्रेक्षक इवाना इतका गुंतलेला असतो की तोही त्याला मनापासून माफ़ करून टाकतो। पैसा वसूल पिक्चर कबूल.
THE END।

भारतातील सगळ्यात मोठी I T कंपनी।
"What started as a marginal gap continued to grow over the years. Every attempt made to eliminate the gap failed...neither me nor the managing director took even one rupee/dollar from the company and have not benefited in financial terms on account of the inflated results. ....
I am now prepared to subject myself to the laws of the land and face the consequences thereof."
कंपनी च्या सीईओ च हे पत्र।

या दोन मधे साम्य हे की तर्कशास्त्र बाजूला ठेवल तरच हे पटु शकत। नाहीतर हे अस घडू शकत हे पचवण निव्वळ अशक्य। पडद्या वरच्या हिरोला आपण किती सहज माफ़ करतो। आणि या रियल-लाइफ हिरोला?
हिन्दी चित्रपट भारतीय समाजाच प्रतिबिम्ब असतात हे या वेळी चूकीचं ठरवणं भाग आहे। नाही का?

No comments: