Tuesday, January 13, 2009

शुभ संक्रांति।

आज मकर संक्रांति!

आज उत्तरायण सुरु होणार। सूर्य उत्तर गोलार्धकडे आपला प्रवास सुरु करणार। उत्तर दिशा म्हणजे उर्ध्व। उत्क्रन्तिची दिशा। दिवस आता मोठा होणार। सूर्य म्हणजे तेज। सूर्य म्हणजे प्रकाश। अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची सुरुवात म्हणजे संक्रांति।

आजच्या दिवशी विष्णु ने असुरांचा वध करून त्यांची डोकी मंदर पर्वाताखाली गाडली। सत्याचा, असत्यावर, वाईटाचा चांगल्यावर विजय म्हणजे संक्रांति।

आज देवायन सुरु होणार। म्हणजे देवांचा दिवस। सगळी चांगली कामे करण्याचा काळ।

आजच्या दिवशी भागिराथाने गंगा पृथ्वीवर आणली। महाराज सागर यांच्या साठ हजार पुत्रन्ना मुक्ति मिल्वुन देण्यासाठी। हे साठ हजार पुत्र म्हणजे आपल्या वाईट विचारांचे प्रतिक। असंस्कृत, अंध महत्वाकंशेचे प्रतिक।

अशा विचारांपासुन मुक्त होण्याचा दिवस म्हणजे संक्रांति।

शुभ संक्रांति।

2 comments:

Amol said...

मकर संक्रांतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छया !!!
काळोखाचा सागर कितीही प्रचंड असला
तरी प्रकाशाची बेटे ही असतातच

म्हणून मग आपणच ठरवायचे की
काळोखाच्या सागरात वाहत जाणारे
पराभूत नावाडी आपण होणार की
प्रकाशाच्या बेटावर सूर्यकिरणाची
लागवड करणारे शेतकरी
--- कुसुमाग्रज

Mi, Sonal said...

sunder...