Wednesday, January 7, 2009

फुल

फुला फुलात फिरताना एक फुल सापडलं
मान टाकुन बसलेल , पाना मागे दड्लेलं

"बाबा तुला झालय काय" मी त्याला विचारलं
तसं ते अंग चोरून अधिकच हिरमुसलं
"रंग तुझा बरा आहे
वास सुद्धा खरा आहे
मग काय झाल रडायला ?
पाना मागे दड़ायला ?
जग कुठे चाललय पहा
जरा सगळ्यात मिसळून रहा
अवती भवति तुझ्याच सारखी किती फूले फुलली आहेत
कधी त्यांच्या रंगाला तर कधी त्यांच्या गंधाला ,
किती मने भुलली आहेत...
तुला नाही का आवडणार त्यांच्यासारख फुलायला?
हवेवरती डुलायला नि फांद्यानवरती झुलायला?"

माझ्या थोड्या गप्पा ऐकुन फुल जरा सावरलं
आणि थोड़ा धीर करून हळूच मला म्हणालं
"ठाऊक आहे मला की छान आहे माझा रंग,
गंध देखिल खरा आहे , कोमल आहे माझे अंग

सगळयान्च्या कौतुकाला फुलेच वेडी भुलतात
उगाच भाबडी खुश होवून वार्यावरती डुलतात

गोड गोड बोलत माणसे हळूच त्यांना खुड्तात
तेवा कुठे डोळ्यावरची त्यांच्या झापडे उडतात

म्हणुन मी मान पाडून पाना मागे लपलो आहे
फुलावेसे वाटुनही पाकळ्या मिटून बसलो आहे

ठर्वलेच आहे मी हे असेच जगायचे
जग किती वाइट आहे हे मी का तुला शिकवायचे ?"

No comments: