Tuesday, December 30, 2008

Happy 2009?

जुन्या वर्षाचा शेवटचा दिवस.
उद्या नवीन वर्ष उजाड़्नार.
हे नेहमीच होत. नेहमीच आपण जुने वर्ष सरताना झालेल्या घटनांचा आढावा घेतो. कोणाला हे वर्षा कसं गेलं, या वर्षाचे हीरो कोण ठरले, येणार्र्या वर्षातल्या ठळक घटना वगैरे वगैरे.
पण हे वर्ष वेगळ आहे. वर्ष सरताना नेहमीच्या उत्साहा पेक्षा वेगळा मूड आहे. निदान माझा तरी. आणि मला खत्री आहे माझ्यासारख्या इतरांचा सुदधा तसाच असेल. ह्या वर्षाने सरता सरता खुप प्रश्न उभे केले. अन्तर्मुख केल.
अक्षांशांनी आणि रेखांशानी आख़लेल जग,
नकाशात बांधलेल जग,
दिशांचे सन्दर्भ घेउन भूगोलात लिहिलेल जग,
वास्तवात किती अस्तव्यस्त आहे,
किती दिशाहीन आहे,
किती अनिश्चित आहे,
हे या वर्षाने दाखवलं.
माणसाचा अंहकार आणि निसर्गाचे नियम यांच्यातला संघर्ष एकीकडे तीव्र होतोय.
आणि या युद्धात, निसर्ग एकजुट आहे पण माणसांमधे मात्र सर्वत्र केवळ यादवी माजलेली आहे. कधी धर्माच्या नावाखाली, कधी जातीच्या-पोटजातीच्या, कधी देशाच्या, कधी भाषेच्या नावाखाली.
कुठे चाललोय आपण? चारी दिशांना फ़क्त हव्यास. आणखी हव, आणखी हव. कोणाला पैसा, कोणाला प्रसिद्धि, कोणाला status, कोणाला सत्ता! हाव कुठे थाम्बत नाहीच. मृगजळा मागे धावण्यात सगळ्यान्ना धन्यता! हे धावण म्हणजे क्षितीजाचा पाठलाग केल्यासारखा आहे हे कधी जाणवणार? हे अस उराफुटी धावताना आपण पायाखाली कायकाय चिरडतोय हे कधी बघणार?
माणसाने, माणसासाठी बनवलेली ही राष्ट्र? की माणसाने माणसाचे शोषण करण्यासाठी केलेली सोय?
सगळ असुनही सगळेच असमाधानी. कारण प्रत्येकाला फ़क्त हवे. पण गमावायच काहीच नाहीये. सगळ कसं safe, smooth, without struggle हव (स्ट्रगल ची नव-श्रीमंत वर्गाची व्याख्या म्हणजे पुस्तक घोकण्यात घालवलेल्या रात्री आणि ऑफिस मधे कंप्यूटर पुढे केलेला रात्रीचा दिवस).

आणि या सगळ्या सगळ्या प्रश्नाच्या भेण्डोळ्यात मला सोडून हे वर्ष निघून चाल्लं?
कोणाकडे बघायच? उत्तर कुठे शोधायची? चन्द्राकड़े आणि सुर्याकड़े झेपावणारे आम्ही, अजुन आमच्या पृथ्वीला तरी खरया अर्थाने आपलस करू शकलोय का?

नवीन वर्षाच्या संध्याकाळी एकच प्रार्थना,
त्या चंद्रकडून थोडी शीतलता आणा. त्या सुर्याकडून थोड़ा प्रकाश.

Happy 2009!

3 comments:

Yogesh said...

मी आतापर्यंत जेवढ पण तुझा लिखाण वाचल त्यानंतर मला एकप्रकाची शांतता, आराम जाणवला .... माझ्यातली अस्वस्थता कमी झाली .... तुझ्या लिखाणात नेहमी नाण्याच्या दोन्ही बाजूचा विचार मांडलेला असतो ... काही मानस असतात ज्याच्या नजरेतून जग बघावस वाटत त्यापैकी तू आहेस... मी कधी कॉम्मेंट टाकणार नवतो पण, असाच मला लिहावस वाटल म्हणून लिहिल .... ...

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

Thanks yogesh. Konitari aapal likhan wachatay aani tyavar vichar kartay he kall ki bar watat. saglech vichar aapan swatahsathi mandat nasto. tyatale kahi vichar itaranparyant pochwanyachi dhadpad aste...happy new year.

Anonymous said...

मला वाचतांना एक स्पार्क जाणवला. तुझ्या लिखाणात. मनापासुन , स्वतःला जे बरोबर वाटतं ते लिहीत जा. उगिच लोकांना काय आवडेल ह्याची काळजी न करता आपल्या मनाला जे पटेल ते लिहायचं. प्रत्येक लिहिलेली गोष्ट "दिल से" असु दे.. ह्या लेखा प्रमाणेच..
लिहित रहा. रोज ब्लॉगवर काही तरी लिहित जा.... छान लिहिलंय.. पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा!