Thursday, January 14, 2010

blogs चं शुभ मंगल.

अभिनन्दन, सोनल. दोन्ही ब्लॉग एकरूप केल्याबद्दल, तेही मकर संक्रांतीच्या दिवशी!

खर म्हणजे मी blogspot वरून सुरवात केली. तेव्हा जे काही सुचायचं ते इथे टाकायचे. योगायोगाने कविता जास्त सुचत गेल्या. म्हणून विचार केला कि हा ब्लॉग फक्त कवितांचा असावा. म्हणून मग wordpress ब्लॉग सुरु केला, कविता सोडून बाकी वाट्टेल ते लिहिण्यासाठी.
नंतर जाणवलं कि दोन्हीचे काही वाचक सारखे आहेत आणि काही वेगळे. मग जेव्हा एखादी post सगळ्यांना दाखवावीशी वाटायची तेव्हा दोन्हीकडे टाकायला लागले. झाल म्हणजे. पहिले पाढे पंचावन्न.
म्हणून हा Blog -mixing excercise . आता sonalwaikul .wordpress या ब्लॉगवर सगळ publish करणार. जे सुचेल ते. वाचकांना देखील सोयीच. आणि मला देखील.
Ofcourse blogspot च्या followers साठी माझ्या कविता publish करेनच.

छे छे हे परत complicate होतंय. श्या ssss . पण कळलं न तुम्हाला आता मला काय म्हणायचय ते?

2 comments:

Unknown said...

यावर दोन अगदी सोपे उपाय आहे. जे प्रत्यक्षात मी माझ्या कवितेच्या ब्लॉगसाठी वापरतो.

१. लिंक गॅजेट सुरु करा, त्यात तुमच्या दुस-या ब्लॉगचा ऍड्रेस द्या आणि ते गॅजेट ब्लॉगच्या वरच्या बाजूला सेव्ह करा.

२. दुसरा उपाय जो मी वापरतो तो म्हणजे फिड वापरण्याचा. तुमच्या दुस-या ब्लॉगची फिड या ब्लॉकच्या साईडबारमध्ये जो आरचिव्ह आहे, त्याखाली द्या. आणि तसंच दुस-या ब्लॉगवरही करा. फिडसाठी लागणारे वेगळे गॅजेटदेखील उपलब्ध आहे.

आशा आहे तुम्हाला या उपायांची मदत होईल.

प्रभाकर कुळकर्णी said...

रोहन बरोबर बोलतोय .