Wednesday, January 13, 2010
आपलच चुकतय!
फुल जेव्हा दवासकट पाकळ्या सगळ्या मिटून घेतं
समजुन जावं,
भुंग्याची ही खोडी नाही, आपलच चुकतय!
ढगामध्ये दाटलेला पाउस जेव्हा न फुटताच आटून जातो
समजुन जावं,
वार्याचा हा दोष नाही, आपलच चुकतय!
पौर्णिमेच आभाळ जेव्हा न तेवताच निवून जातं
समजुन जावं, संध्याछाया निर्दोष आहेत
आपलच चुकतय!
ऐन बहरात गुलमोहोराचा बहर जेव्हा जळून जातो
समजुन जावं, उन्ह बिचारी निमित्त मात्र
आपलच चुकतय!
नेहमी नेहमी किती करायचा आक्रोश, त्रागा, आरडा ओरडा
थकून भागून हतबल होवून मन मनाशी नाळ तोडतं
तेव्हा समजुन जावं...
आपलच चुकतय!
Labels:
ट ला ट फ ला फ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
मस्त !
एखाद्या नाटकात छान स्वगत होऊ शकेल हे ..!
खुपच छान !!! अप्रतिम..
kharch aaplch chukatay..
छान..आवडल
तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Saglyanche khup khup aabhar aani Makar sankrantichya hardik shubbheccha.
wonderful thought process..
वन्डर फ़ुल थॉट प्रोसेस इज करेक्ट कमेंट .
Post a Comment