Tuesday, December 22, 2009

उत्स्फूर्त

कॉलेज मधे असताना लिहिलेल्या काही चारोळ्या / सातोळ्या डायरीत सापडल्या। इथे पोस्ट करतेय। कागद अगदी फाटत आलाय।


अरे प्रवास प्रवास
जसा विरार चा पास
आधी गर्दीताले धक्के
तेव्हा मिळे उतरायास


माझी नाव बुडणारच होती
तरीही मी खवळलेल्या समुद्रात शिरत होते
मला बुडण्याची भीती नव्हती
मी स्वतः एक वादळ होवून फिरत होते।


आयुष्यात प्रेम येता येता राहून गेल
ओघळणार्या आसवातून नाही
खळखळणार्या हसण्यातून वाहून गेल।


आम्ही एकत्र हसत होतो
एकमेकावर रुसत होतो
एकमेकात फसत होतो
कळलच नाही तो कधी बाहेर पडला ते...
तो देखील फसला होता,

पण बहुदा त्याच गुंतायचं राहून गेलं।

5 comments:

Yawning Dog said...

Mast. Doosaree khoopach avadalee mala.

सचिन उथळे-पाटील said...

खुपच सुंदर. मला तीन नंबर ची खुपच आवडली

Anonymous said...

पहिलीच मस्त आहे..
अरे प्रवास प्रवास
जसा विरार चा पास
आधी गर्दीताले धक्के
तेव्हा मिळे उतरायास

( अरे संसार संसारंचया चालीवर छान म्हणता येते..पुढचे कडवे पण लिहायला हरकत नाही..)

Big Small Things..!! said...

Pahili ani Chouthi donhi ekdum sahi ahet...
keep it up

Yogesh said...

superb :)