एक क्षण जगण्याचा
ओन्जळ भरून चैतन्याने
अंतर्बाह्य फ़ुलण्याचा
एक क्षण देण्याचा
डोळा मिटल्या पाकळीवरचे
दव टिपून घेण्याचा।
एक क्षण हसण्याचा
खळिमधल्या भोवर्यामध्ये
अलगद जाउन फ़सण्याचा
एक क्षण हरण्याचा
नजरेमधल्या विश्वासाने
आभाळ तोलून धरण्याचा
एक क्षण मरण्याचा
उधळुन ठेवा हृदयामधला
मनामनात उरण्याचा
7 comments:
surekh. kharach surekh aahe.
kaki!!!!!!
maja ali mala jam!
tuza ha chanda mahitch navhata mala vadi !!
jorat ahe kavita,mala jam avdli!!!
ek kshan avadnyacha
sundarshaa hyku madhe
Ek ol vadhavanyaacha..
Khoop avadali..
Lai bhari!
एक क्षण प्रेमाचा
फक्त एकदा घेउन
जन्मभर देण्याचा ..
@all; thanks for adding up :)
chan ... after long time
Post a Comment