Tuesday, June 23, 2009

नुकताच पडलेला पाउस

नुकताच पडलेला पाउस!
त्याच्या खूणा रानावर, मनावर...

कौलावरतुन ओघळताना
मातीत पाउस विरघळताना
अवखळ खळ्खळ दुड़्दुडताना
खडकामधून अडखळताना

तहानलेल्या तळ्यावरती
थरथर मोती शिम्पडताना
डोंगर दर्र्यात स्वैर रानभर
वार्र्यासंगे हुन्दडताना

ठाउक असतेच त्याला कुठे
कबूल झाली किती आर्जवे
धुतली गेली किती जळमटे
वाहून गेली किती आसवे

किती पालव्या नवीन झाल्या
फुटले आणिक किती धुमारे
किती विझवली तप्त मने अन
हिरवी झाली किती शिवारे...

चिम्ब हिरव्या पानामध्ये
अजुनही साठलेला
निळी जांभळी गर्दी करत
मनामध्ये दाटलेला

नुकताच पडलेला पाउस... त्याच्या खूणा रानावर, मनावर...

1 comment:

Anonymous said...

Mastach!