Tuesday, April 28, 2009

वाघोबा नि ढग्गोबा

एक होता वाघोबा
त्याला भेटला ढ्ग्गोबा

गडाडून ढग्गोबाने बाहेर काढली विजेची छड़ी
फोडून मोठी डरकाळी वाघोबने केली कड़ी

ढग्गोबाने सोडल्या जटा सार्या दिशा अंधारल्या
वाघोबाने गुर्गुरत मिशा आपल्या फेंदारल्या

बघता बघता दोघांचे भांडण चांगलेच रंगात आले।
वाघोबाचा आवाज चढ़ला ढग्गोबाच्या अंगात आले।

वाघोबाला पडला प्रश्न याला कसे हरवायचे?
शिकारीचे डावपेच इथे नाही चालायचे।

इतक्यात आले कोल्होबा म्हणाले "घाबरू नका"
घेऊन एक सुई फ़क्त त्याचा फुग्गा फोडून टाका

2 comments:

Yawning Dog said...

pharach mast :)
Radio var gane lagle ahe asha suraat vachale ke maja yete :)

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

Thanks YD.