कोटी कोटी आकाशगंगेतल्या
असंख्य सुर्यांपैकी कोण एका सूर्याच्या मेहेरबानी वर तगलेल्या
एका खड्याच्या पाठीवर
रांगणा-या असंख्य जीवांपैकी एक सूक्ष्म मासाचा गोळा।
हेच अस्तित्व.
त्याचं जगण मरणं वगैरे गोष्टी दैनंदिनीचा भाग एक!
बाकी तुझा खरा जन्म आणि मरण दोन्ही होत असत खोल खोल आत
फक्त तुझ्या मनात; फक्त तुझ्या मनापुरतच।
एरवी तू नसल्याशिवाय तुझ्या असण्याची तरी जाणिव कुठे असते;
ना त्या खड्याला, ना त्या सूर्याला,
पण तुझ्या खिडकीतलं रोप मात्र शोधत तुला रोज;
सूर्य त्याची तहान नाही भागवू शकत।
Wednesday, May 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

5 comments:
Aataparyantchi sarvat BEST .... GRE8
Thanks Yogesh.
Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com
अर्थपुर्न
मस्तच ... खुपदा स्वतःच्या अस्तित्वाबद्दल असले प्रश्न पडतात. शब्दांत नाही मांडता आले मला कधी. धन्यवाद.
Post a Comment