Monday, April 20, 2009

संन्यस्त

संन्यस्त असे एक झाड़ उभे, तो माळ भकास उजाड़
सुकलेल्या निव्वळ फांद्या, अन वठलेले एकच खोड

तो म्हणे "त्यजुनी पाने, अन हिरवळ सारून दूर
टाळले मीच फ़ुलण्याचे, घेतला मीच संन्यास
मम नको पाखरे, घरटी, नच कुजबुजणे पानांचे
मम नको फुलांचा साज, फळांचा मोह, नाही हव्यास..."

हे एइकुनी हसला मेघ, म्हणाला "शक्य नाही मी फ़सणे।
माझ्या इच्छेवर आहे निर्भर तुमचे असणे नसणे.
का करीशी वल्गना खोटी, म्हणे मज नाही लोभ हव्यास?
मज ठावूक आहे पक्के, तुजला हिरवाईचा ध्यास।
जर असेल ही निवृत्ति, जर असेल हा संन्यास
का अजुनी मुळे रुतलेली, तुटले ना अजुनी पाश ?"


2 comments:

Yawning Dog said...

pharach avadali mala kavita...sahee aahe
shevat tar sundarach !

Nikhil said...

Apratim!!!!!