Wednesday, June 24, 2009

पुन्हा

पुन्हा एकदा पाउस आला
पुन्हा त्याने माफ़ केलं
पोटभर रडून त्याने
पुन्हा मन साफ़ केलं

पुन्हा त्याच्या रडण्याचा
माणसाने अनर्थ केला
त्याच्या कोडग्या मुजोरीला
पुन्हा पाउस शरण आला

आता पुन्हा गोड बोलून
माणुस त्याला थांबवून घेइल
आपली तळी भरून घेइल
आपली पिकं करून घेइल

पुन्हा त्याला घरी जाताना
देइल भरून खोटी वचने
फ़सेल पुन्हा तो ही भोळा
जाइल घरी विश्वासाने

वर्षभर वाट बघत
पुन्हा पाउस हिरमुसेल
यंदा मात्र जायचच नाही
म्हणत दूर जाउन बसेल

पुन्हा माणुस दाखवेल त्याला
फाडून काळीज धरणीचं
लबाड लांडगा फसवेल पुन्हा
पांघरून कातडं शेळीचं

6 comments:

सर्किट said...

आई ग्गं! क्या बात है! शब्दांचा वापर एकदम सही केलायेस. ब्लॉगिंग करणारे नवोदित कवी जसे काहीही शब्द कुठेही वापरून कवितेची गोधडी विणतात त्या अडखळण्याचा मागमूस नाही तुझ्या कवितेत. एखाद्या मातब्बर कवी(यित्री)ने लिहील्यासारखी झालीये कविता.
पण लबाड माणसाने भोळ्या पावसाला नक्की काय खोटी वचने दिली, किंवा दरवर्षी देतो ते न कळल्याची रूखरूख लागून राहिली. अर्थात सगळं स्पष्ट करून लिहायला कविता म्हणजे परीक्षेतल्या प्रश्नाचं उत्तर नसतं!

Yawning Dog said...

Khoop chhan ahe. Pavasala suru zalyapasoon itkya kavita vachalya pavsavar, pan hee pahili manapasoon avadalelee

Anonymous said...

लबाड लांडगा फसवेल पुन्हा
पांघरून कातडं शेळीचं ...
कविता खुपच सुंदर झाली आहे.

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

@circuit. Abhari aahe.
khar tar mansachi wachane elaborate karayacha wichar kela hota. Pan achuk shabdrachana nahi karata aali. mag watal ki sagli wachan lihu mhatal tar kavita mhanje EVS cha dhada watu laagel :D mhanun evhadhyawarach thambale. Pan khar aahe, ithe jara kamich padali imagination majhi.
@YD, thanks. majha abhyas tujhya Paawasachya abhyasaitaka dandga nahi :D. Tujhi paawasawarchi badbad khasach hoti.
@Mahendraji, thanks.

Yogesh said...

Donihi kavita aavadlya ... ajoon pahije tasa rdla nahiy mhana paus :) .... ek vegalach Flavor aahe donhi kavitencha .... aata pavsalyavr kavitanchi Series suru zaley tar ek Romantic kavita pan lihayla harkat nahiy ... heheh ....

Unknown said...

farach chhan waikul bai.. uttam.. asech chalu det..