Friday, June 12, 2009

आरसा

माझ्या डोळ्यात बघत आरसा विचारू लागला "सांग मी दिसतो कसा?"

हसत हसत उडवून लावल मी त्याला तसा हिरमुसला
परतवून लावले काही किरण त्याला भेटायला आलेले
माझ्याही डोळ्यात खुपले त्यातले काही...

समजूत काढावी म्हणुन जरा त्याच्याकडे पाहिलं आणि काय सांगू?...
कळेचना कोणाच्या डोळ्यात कोण पाह्तय
कोणाच्या घरात कोण राह्तय

त्याच्या डोळ्यात दिसलं मला सर्व काही...
फ़क्त त्याची ओळख सोडून!

मला दिसला माझा चेहरा
आणि काही निर्जीव वस्तू बसल्या जागून डोकावणार्या
भिंती, माझ्या भोवतालच्या
पारदर्शक काचे सारख्या, न दिसता फसवणार्या

जागाच कुठे होती त्याच्या डोळ्यात
स्वतःची ओळख मांडायला
स्वतःची दुक्ख सांगायला

"ज्याला जसा हवा तसा दाखवताना दिसताना
प्रत्येकाच्या सुखदुःखात रडताना हसताना
तुझा चेहरा तुझा नसतो तरी इतका खरा खरा
तुझ्या चर्यात (चरा) दिसत असतो माझ्यावरचा ओरखडा

आम्ही असावे तुझ्यासारखे, बिनचेहरयाची नितळ मने
एकमेकांसारखी होत एकमेकांना पाहणारी
एकेकट्याला जुळे करत साथ सोबत करणारी

क्षण अन क्षण बिंबागणिक दिसणे तुझे नवे आहे
सत्य शिव सुंदर मात्र असणे तुझे हवे आहे"

5 comments:

Yawning Dog said...

themes veg veglya asalya taree, magchee kavita hoti chhabee anee atta aarasa :)
saDhyaa pratibimbe gholat ahet vatate dokyaat :D

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

:D just a co-incidence! actually aadhi ek gamatishir kalpana suchali ki aarasa jar male wicharil ki mi kasa disato tar? aani mag tya gamatimadhali grey shade disaayla laagli.

सर्किट said...

sahee.

baraha vaparates ka? ऱ्या liheeNyaasaThi "rxyaa" type karr.

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

@Circuit, Google indic waaprate. khup try kela pan kahi kahi akshar nahich yet jashi chya tashi. :( dusara kuthala editor aahe ka?
BTW, thanks for all the compliments.

सर्किट said...

www.baraha.com varun zip file d/l karun install karr. barech options ahet tyat.

barahapad madhe type, save, copy, paste karu shakates. or baraha-direct task running thevun kuthalyahi window madhe direct marathi type karu shakates. toggle between mar/eng with F12 (i guess).

mi tari fakt tech vaparato.