Thursday, May 28, 2009

आली मंदी!

याला कविता म्हणावे की मुक्तछंद माहीत नाही. म्हणुन दोन्ही ब्लोँग्स वर टाकते आहे.काहीतरी सुचलेलं असच...
***********************************************************************************
रविवारच्या भल्या पहाटे दारावरती टक टक झाली.
टक टक कसली खरे पाहता कटकट झाली.


झापड़ उडवून महत्प्रयासे दार उघडले
दारामध्ये अंधुक धूसर एक आकृति
डोळे चोळुन काढून चिमटा पुन्हा स्वतःला नीट निरखले
तरी दिसेना म्हटले जडली काय विकृति?


"पाहतोस काय डोळे फाडून, दार उघड" , वदली मूर्ति।
"
भल्याभल्यांनी वाट पाहिली, केली किती माझी आळवणि
तेव्हा दिधले दर्शन त्यांना, तो मी चालत दारी आलो तुला पुसाया
कसली भीती?कसली क्षिति?"


आ वासुनी मुकाट मीही दार उघडले, डोळे माझे सताड उघडे,
घामाने भिजलेला थबथब, पायी थरथर, दिवसा सुद्धा दिसले तारे।

"क्षमा करा ओळखले नाही, बसा आणु का पाणी घोटभर?"
"मी आहे स्रुष्टिचा कर्ता, कुणी म्हणे परमात्मा आणि कुणी नियंता,
"तहानलेले आम्ही भक्तीचे, पाणी देवून करा बोळवण", कुत्सित थट्टा।

"आज कुणीकडे इकडे येणे केले आपण, काय समस्या?
मी तर पामर, क्षुद्र एक जीव, नाही केली व्रत वैकल्ये, उग्र तपस्या!"


"आठवते का काही महिन्यांपूर्वी होता नवस बोलला, माथा रगडूनी?
वाचवली होती आम्हीही तुझी नोकरी राहू-शानिचे देणे फेडूनी।"

"खरे पाहता आम्हीच चुकलो,पूर्ण करोनी मनोकामना,
भुललो मोहा फ़ुगत चाललो एईकून महती,
आणि स्वतःचे कौतुक कीर्ति
फसगत झाली मोहापायी, करचुकव्यांना देवून संधि
फिरतो आता दारोदारी, करत वसूली..., काय करावे आली मंदी!"


**********************************************************************************

7 comments:

Yogesh said...

Super Hit

Yogesh said...
This comment has been removed by the author.
Yogesh said...
This comment has been removed by the author.
Yawning Dog said...

Sundarrrrrrrr...shevat mast !

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

Thanks Yogesh, Thanks YD.

सर्किट said...

he..he.. sahee.

tujha ha blog aaj pahila, ani ekamagun ek kavita vachat ahe. khara kavita ha prakar eka diwashi ekach vachava, ani diwasbhar supari sarakha chaghaLat thevava asa.

Aparna said...

aga me aajach pahila tuza blog.
masta aahe hi kavita :)